श्रेयस पाटीलची भारतीय वायुसेनेत निवड
श्रेयस पाटीलची भारतीय वायुसेनेत निवड
चंदगड:
जिद्द, चिकाटी याच्या जोरावर धुमडेवाडी येथील श्रेयस पाटील याने भारतीय वायुसेने मध्ये तिसऱ्या वेळी यश मिळविले. चंदगड सारख्या दुर्गम भागातून हे यश मिळविणे कौतुकास्पद आहे. विवेक इंग्लिश मिडीयम येथे श्रेयसचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण सायरस पुनावाला इंटर नॅशनल स्कूल पेठवडगाव येथे सीबीएससी माध्यमा मध्ये झाले. एनडीए साठी दोन वेळा पात्र होऊन सुद्धा श्रेयसला यश मिळत नव्हते. म्हणून त्याने पुणे येथे माहिती तंत्रज्ञान ( IT )अभियांत्रिकी हा अभ्यास क्रम पूर्ण केला. त्यानंतर त्याने एनडीए मध्ये भरती होण्याची पूर्ण तयारी केली व म्हैसूर येथे झालेल्या एसएसबी परीक्षा व बंगलोर येथे झालेल्या वैद्यकिय परीक्षेत यश मिळविले. नुकत्याच जाहिर झालेल्या ऑल इंडिया मेरिट लिस्ट मध्ये श्रेयसने 32 वा क्रमांक पटकावला. त्याच्या या यशात वडील राजीव पांडूरंग पाटील व आई राजश्री राजीव पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. श्रेयसच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.