ढोलगरवाडी ड्रग्स फॅक्टरीचा मुख्य आरोपी अटक

Total Views : 1,474
Zoom In Zoom Out Read Later Print

विचारांचे व्यासपीठ न्यूज लाईफ चंदगड

चंदगड / प्रतिनिधी, चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी राजकुमार राजहंसला मुंबई अंमली पदार्थ  विरोधी पथकाने मालाड परिसरात अटक केली आहे. गेली चार दिवस या  ड्रग्स प्रकरणामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह  महाराष्ट्रभर  चर्चा सुरु होती. चंदगड सारख्या ग्रामीण भागात २ कोटी ३५ लाख रुपयाचे  ड्रग्स  मिळणे, हि एक धक्कादायक बातमी चंदगडकरांना बघायला मिळाली . या प्रकरणाशी संबधित मुंबईत एका महिलेला व ढोलगरवाडीतील फार्महाउसच्या  केअरटेकरला अटक झाली होती. ख्रिस्थिना उर्फ आयेशा आणि निखिल लोहार यांचा अटकेनंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी असणाऱ्या राजकुमार राजहंसला आज अटक करण्यात आली. एकंदरीत या प्रकरणामुळे चंदगडकरांना एक मोठा धक्का बसला आहे. याचे कारण म्हणजे  ड्रग्स प्रकरणे शहरात घडलेली पाहिली आहेत. पण चंदगडच्या भूमीत अशा घटना घडणे खूप वाईट आहे. चंदगडच्या पोलीस प्रशासनाने ह्या गोष्टीकडे गांभीर्याने बघणे अत्यंत गरजेचे आहे. अशी चंदगडची जनता म्हणत आहे. 

See More

Latest Photos