एसटी बस प्रवाशांच्या सोयीसाठी की चालक वाहकांच्या सोयीसाठी.
एसटी बस प्रवाशांच्या सोयीसाठी की चालक वाहकांच्या सोयीसाठी.
कोवाड / प्रतिनिधी ...मलतवाडी मुक्काम एसटी चंदगड येथून सायंकाळी सात वाजता मलतवाडी मुक्कामसाठी निघते मलतवाडी येथे रात्री आठ वाजता पोचते.ही बस मलतवाडीहुन पहाटे सहा वाजता कोवाड व नंतर कामेवाडी परत कोवाड व नंतर कोवाड करेकुंडी सुंडी ढोलगरवाडी मार्गे हलकंर्णी चंदगड अशी फेरी आहे.ही बस मलतवाडी गावात मुक्कामला असते परंतु या बसचा मलतवाडी गावासाठी काहीही उपयोग होत नसल्याचे तेथील नागरीकांचे मत आहे . ह्या एसटीने मलतवाडी गावचे कोणीही प्रवाशी शालेय विद्यार्थी जात नाहीत. कारण शालेय विदयार्थ्यांच्या सोयीनुसार ही बस चालू केलेली नाही, ही बस विद्यार्थ्यांसाठी सकाळी सात वाजता मलतवाडीतून कोवाडला जाण्यासाठी निघायला पाहिजे होती.
पंरतु ही एसटी सकाळी सहा वाजता लवकर निघून जाते . त्यामुळे ही एसटी प्रवाशांच्या आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नसून केवळ परिसरातील चालक ,वाहकांच्या सोयीसाठी मुक्कामला सोडल्याचे विद्यार्थी प्रवाशातून मत व्यक्त होत असते.बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याचा विचार करून ही बस विद्यार्थी प्रवाशांच्या वेळेत कशी चालू करता येईल याचे नियोजन चंदगड आगार व्यवस्थापकांनी करावे अशी विद्यार्थी प्रवाशाकडून मागणी होत आहे.सध्या पावसाळा असतानाही विद्यार्थी एसटीने न जाता पायपीट करत कोवाडला शिक्षणासाठी येत आहेत .पहाटे सहा वाजता कोवाडला येऊन दीड तास पावसात कुठे थांबायचं हा प्रश्न उपस्थित होत आहे .म्हणून विद्यार्थी संख्या पन्नास असूनही सर्व विद्यार्थी पायी येत आहेत. याचा एसटी प्रशासनाने विचार करावा अशी मागणी विदयार्थी व नागरीक करत आहेत .