गुडेवाडीचा गौरव रमेश पाटील स्पर्धेचा मानकरी
रवींद्र पाटील यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त आंतरराज्य सामान्य ज्ञान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
चंदगड (प्रतिनिधी):
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने रवींद्र पाटील यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त आंतरराज्य सामान्य ज्ञान स्पर्धा – 2024 चे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरण समारंभ महात्मा फुले विद्यालय, कार्वे येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. एम. गावडे (महात्मा फुले विद्यालय, कार्वे) होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. परशराम पाटील (जागतिक अर्थतज्ज्ञ) आणि उपप्राचार्य आर. बी. गावडे (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय) यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय जॉर्ज क्रुझ (विजयश्री बुक, कोल्हापूर) यांनी विशेष मार्गदर्शन केले.
सत्कारमूर्ती रवींद्र पाटील यांचा 51 व्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. परशराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील स्पर्धांसाठी कसे त्यावर व्हावे याचे मार्गदर्शन केले. उपप्राचार्य आर. बी. गावडे यांनी ज्ञानवृद्धीचे महत्त्व समजावत प्रामाणिकपणाने अभ्यास करण्याचा सल्ला दिला. स्पर्धे मध्ये एकूण तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचा निकाल (गुणानुक्रम):
प्रथम क्रमांक:
1. गौरव रमेश पाटील (स्वामी विवेकानंद विद्यालय, गुडेवाडी)
द्वितीय क्रमांक:
1. अपूर्वा मोहन भोगुलकर (संजय गांधी विद्यालय, नागनवाडी)
2. शर्वरी तुकाराम पवार (तेऊरवाडी विद्यालय, तेऊरवाडी)
3. साईराज सुनील पाटील (संजय गांधी विद्यालय, नागनवाडी)
तृतीय क्रमांक:
1. अभिज्ञान सुधीर गिरी (संजय गांधी विद्यालय, नागनवाडी)
चतुर्थ क्रमांक:
1. मानसी परशराम गुरव (संजय गांधी विद्यालय, नागनवाडी)
पाचवा क्रमांक:
1. हर्षवर्धन जोतिबा पाटील (धनंजय विद्यालय, नागनवाडी)
2. सुमित पुंडलिक कुंभार (संजय गांधी विद्यालय, नागनवाडी)
3. मयुरेश मनोहर चांदेकर (धनंजय विद्यालय, नागनवाडी)
4. जान्हवी विश्वास पाटील (श्रीराम विद्यालय, कोवाड)
सहावा क्रमांक:
1. सुयश नारायण मोरे (धनंजय विद्यालय, नागनवाडी)
2. आयुष्य शटुप्पा फडके (शिवाजी विद्यालय, माणगाव)
3. मयुरी सुनील गावडे (संजय गांधी विद्यालय, नागनवाडी)
4. श्रेयश रमेश पाटील (धनंजय विद्यालय, नागनवाडी)
5. कुणाल काशिनाथ पाटील (स्वामी विवेकानंद विद्यालय, गुडेवाडी)
6. विपुल विजय कडूकर (द न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड)
सातवा क्रमांक:
1. ज्योती शंकर पाटील (स्वामी विवेकानंद हायस्कूल, गुडेवाडी)
उत्तेजनार्थ - कु.देवयानी तानाजी पाटील (रा.शाहु विद्यालय शिनोळी बु . )
यावेळी शिवाजी मोहनगेकर , बी एन पाटील , व्ही एल सुतार , कमलेश कर्णिक , सागर बोकडे , तानाजी पाटील ,
सटुप्पा फडके , सुरेश नाईक परिक्षक म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एच. आर. पाऊसकर यांनी केले, तर प्रास्ताविक एम. एम. शिवणगेकर यांनी केले. आभार प्रदर्शन संजय साबळे यांनी केले.