अपघातात जखमी झालेल्या कोवाडच्या तरुणाचा मृत्यू
अपघातात जखमी झालेल्या कोवाडच्या तरुणाचा मृत्यू
कोवाड (ता. चंदगड) येथील तरुण शुभम शिवाजी कुट्रे (वय 28) हा तरुण तेऊरवाडी जवळ अपघातात जखमी झाला होता. त्याच्यावर कोल्हापूर येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना रविवारी (दि. 8) रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
.....
याबाबत अधिक माहिती अशी की शुभम हा कोवाड येथे वास्तव्याला होता तो सध्या एका अमेरिकन मेडिकल कंपनीसाठी वर्क फ्रॉम होम असे
काम करत होता. दि. 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कंपनीच्या कामासाठी नेसरी येथे गेला होता रात्री दहा वाजता परत कोवाड या आपल्या गावी येत असताना हडलगे ते तेउरवाडी या मार्गावर तेउरवाडी जवळील वळणाजवळ उताराला त्याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला यावेळी त्याला मार लागला होता. यानंतर त्याला गडहिंग्लज येथे खाजगी दवाखान्यात उपचाराला हलवले होते. यानंतर त्याच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते या दरम्यान उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याचा रविवारी दि. 8 डिसेंबर रोजी मृत्यू झाला त्याच्या पश्चात आई-वडील भाऊ बहीण असा परिवार आहे कोवाड येथील निवृत्त सैनिक शिवाजी कुट्रे यांचा तो मुलगा तर व भारतीय सैन्य दलाचे जवान संतोष कुट्रे यांचा तो भाऊ होय. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. 9) सकाळी कोवाड येथे होणार आहे.