मानसिंग खोराटे यांची गोव्यातील तरुणांना भावनिक साद; गोव्यात निर्धार मेळावा
चंदगडच्या शाश्वत विकासात उद्योगाला प्राधान्य... नारळाची बाग घेऊन उद्योगाची बाग फुलवू : मानसिंग खोराटे
Total Views :
226
चंदगडच्या शाश्वत विकासात उद्योगाला प्राधान्य... नारळाची बाग घेऊन उद्योगाची बाग फुलवू : मानसिंग खोराटे
मानसिंग खोराटे यांची गोव्यातील तरुणांना भावनिक साद; गोव्यात निर्धार मेळावा
चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड मतदारसंघाचा शाश्वत विकास करताना रोजगारालाच आपलं पाहिलं प्राधान्य असणार आहे. आजही चंदगडच्या तरुणाईला मुंबई, पुणे आणि गोव्यासारख्या ठिकाणी कामासाठी जावं लागतं. त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी घरापासून लांब राहून कष्ट करावे लागत आहेत. त्यामुळे सर्वात आधी उद्योग आणि रोजगार आणणे हेच माझं मुख्य उदिष्ट असल्याचे मानसिंग खोराटे यांनी सांगितले. त्यामुळे चंदगड मतदारसंघ उद्योगस्नेही बनवून इथली बेरोजगारी संपवण्यासाठी उद्याच्या निवडणुकीत मतदान करा, नक्कीच नारळाची बाग घेऊन उद्योगाची बाग फुलवू असं आवाहन मानसिंग खोराटे यांनी तरुणांना केले.
गोवा येथे घेण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ऍड. संतोष मळविकर, सुनील शिंदे, नामदेव वर्पे, संजू पाटील, रवळनाथ वर्पे यांच्यासह चंदगडचे गोवा स्थित अनेक युवक, युवती, नोकरदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप गावडे यांनी केले तर आभार सागर कदम यांनी मानले.
चंदगडकरांनो हीच शेवटची संधी, निर्णय घ्याआज गोवा हा रोजगार आणि पर्यटनात अव्वल आहे. चंदगडचे अनेक तरुण गोव्यात एक तर नोकरी किंवा हॉटेल व्यवसायात आहेत. गोवा राज्याचं उद्योगस्नेही वातावरण, पर्यटनातील संधी त्यातून निर्माण झालेला उद्योग, व्यवसाय हे दोही चालवतात आपले चंदगडकर आणि गोवा राज्याला पुढे नेत आहेत. मात्र, तेच आमचे तरुण केवळ आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी घरादारापासून लांब राहून कष्ट करत आहेत. त्यांना जर चंदगडमध्येच रोजगार मिळाला तर त्या एवढं मोठं कुठलेच काम नाही. ती धमक आणि क्षमता फक्त मानसिंग खोराटे यांच्यात आहे. त्यामुळे हीच शेवटची संधी असून प्रचंड मतांनी खोराटे यांना निवडून द्या असे आवाहन ॲड. संतोष मळविकर यांनी केले.
चंदगड मतदारसंघाच्या समस्या फक्त खोराटेच सोडऊ शकतातमानसिंगराव खोराटे यांच्या रूपाने चंदगड तालुक्याला एक उच्चशिक्षित नेतृत्व लाभले आहे. चंदगड तालुक्यातील बेरोजगारी दूर करण्याची क्षमता फक्त आणि फक्त खोराटे त्यांच्यात आहे. चंदगड तालुक्यात ज्या अनेक समस्या आहेत मग ते आरोग्य असो, शिक्षण असो, वा पर्यटन असो या सर्व समस्यावर उत्तर म्हणजे मानसिंगराव खोराटे. याला कारण चालवण्याला अशक्य वाटणारा दौलत कारखाना ते उत्तमरित्या चालवून जर महाराष्ट्रात टॉप फाईव्हमध्ये नेऊ शकतात तर मग चंदगड मतदारसंघाच्या सर्व समस्या फक्त तेच सोडऊ शकतात यावर आज सर्व तरुणांचा ठाम विश्वास झाला असल्याचे मत सुनील शिंदे यांनी व्यक्त केले.
पर्यटन विकासावर भर
गोवा हे पर्यटनाचं जागतिक केंद्र बनलं आहे. तीच निसर्ग संपदा, तेच वातावरण आणि एका पेक्षा एक निसर्गसंपन्न ठिकाणं चंदगड तालुक्यात आहेत. तरीपण गोव्याला पर्यटक जातात, ते चंदगडला येत नाही. याला कारणीभूत आहे, पर्यटन विकासातील कमतरता. आज केवळ राजकीय इच्छाशक्ती असेल तर पर्यटन विकास नक्की होऊ शकतो. त्यासाठी पर्यावरणाचं संवर्धन करून तिथे पर्यटन विकास करण्याची गरज आहे. चांगले हॉटेल्स, ट्रेकिंग पॉइंट्स, स्पोर्ट्स अक्टिव्हीटी, गडकिल्ल्याचं संवर्धन, इको टुरिझम आणि ऍग्रो टुरिझम अशा क्षेत्रात विकासाला वाव आहे. ते करण्याची धमक आणि इच्छाशक्ती पाहिजे. त्यासाठी तुम्ही नेतृत्व बदला. बदल हवा तर आमदार नवा ही संकल्पना घेवून मानसिंग खोराटे यांना निवडून द्या असं आवाहन मळविकर यांनी केले.