चंदगडच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढायला संधी द्या* *मानसिंग खोराटे यांची साद; तरुणाईशी साधला संवाद*
चंदगडच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढायला संधी द्या* *मानसिंग खोराटे यांची साद; तरुणाईशी साधला संवाद*to
*चंदगडच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढायला संधी द्या*
*मानसिंग खोराटे यांची साद; तरुणाईशी साधला संवाद*
चंदगड (प्रतिनिधी) : राजकारण्यांनी कारखाना चालवला, अनेक उद्योग केले तर चालतात, मग कारखानदार, एखादा सुशिक्षित उद्योजक राजकारणात का नाही चालणार? उलट तरुणाईने, सुशिक्षित लोकांनी राजकारणात येण्याची आज गरज आहे. त्यातूनच चांगले बदल घडून विकासाचा जो काही बॅकलॉग आहे तो भरून निघेल. त्यामुळे सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या नोकरी, व्यवसाय आणि उद्योगाचा अनुभव असलेल्या माझ्यासारख्या सुशिक्षित उमेदवाराला लोक नक्की पाठबळ देतील असा विश्वास मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केला. वारंवार दौलतवरून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला खोराटे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान तरुणाईशी संवाद साधताना उत्तर दिले. तसेच मतदारसंघासाठी असणारे व्हिजन, उद्योग व्यवसायाचा अनुभवातून केलेली आखणी यातून एक विकसित चंदगडचं मॉडेल उभं करायचा संकल्प लोकांसमोर मांडला. ते गडहिंग्लज भागातील युवक-युवतींशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. यावेळी गडहिंग्लज भागातील सुशिक्षित तरुणाई, महिलांसह सामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेतली असून नक्की बदल घडेल असा विश्वास राजवर्धन शिंदे सांबरेकर यांनी व्यक्त केला.
खोराटे म्हणाले, आज जरी मी एक उद्योगपती, कारखानदार दिसत असलो तरी माझी सुरुवात ही सामान्य शेतकरी कुटुंबातून झालेली आहे. आजऱ्यातील हालेवाडीसारख्या अगदी नकाशावरील न दिसणाऱ्या गावातून मी शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि कारखानदारी असा खडतर प्रवास केलेला आहे. त्यामुळे मला वारसा हक्काने काहीही मिळालेलं नाही. मी स्वकर्तृत्वाने इथवर पोहचलो आहे. त्यामुळे गरिबी, बेरोजगारी आणि कष्टाची मला चांगली जाण आहे. त्यामुळेच सर्वसामान्यांचे प्रश्न, त्यांचं दुःख चांगल समजू शकतो. त्यावर मात करून प्रत्येकाला संपन्न असं जीवन देण्यासाठी माझी ही धडपड आहे. आणि ती तळमळ लोकांना कळते, त्यामुळे जनताच मला विधानसभेत पाठवेल असा विश्वास खोराटे यांनी व्यक्त केला.
जे मी सांगतोय ते मी करून दाखवणारचं
वारसा हक्काने आलेली पदं आणि सहानुभूतीवर मी कधीही अवलंबून नाही. त्यामुळे लोकांना जे शक्य आहे तेच मी सांगतोय. आणि ते मी करून दाखवणारचं. त्यामुळे नव्या पिढीला नवा बदल हवा असून त्यासाठी मी कटिबध्द असून नक्कीच चंदगड मतदारसंघात बदल घडवून दाखवणार असा विश्वास खोराटे यांनी व्यक्त केला. यावेळी तरुणांच्या समस्या, त्यांच्या असलेल्या अपेक्षा जाणून घेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. यावेळी तरुणांमध्ये खोराटे यांच्याबद्दल एक क्रेझ असल्याचे दिसून आले.