*विचारांचे व्यासपिठ.....* *न्युज लाईफ चंदगड.....* ✒️✒️✒️✒️... *विचार बदला ... जिवण बदलेल ...*
तलाठी दिपक कांबळे यांना महसुल विभागाचा आदर्श तलाठी पुरस्कार प्रदान ...
तलाठी दिपक कांबळे यांना महसुल विभागाचा आदर्श तलाठी पुरस्कार प्रदान ....... कोवाड / प्रतिनिधी ... चंदगड येथे तलाठी पदावर कार्यरत असणारे दिपक कांबळे यांना आज स्वातंत्र्यदिनी गडहिंग्लज येथे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात आहे . तलाठी दिपक कांबळे यांनी कोविड प्रतिबंधक , कायदा व सुव्यवस्था , महापुर , मदतकार्य , महसुली वसुली , निवडणुक तसेच दैनंदिन कामकाजामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल व जनतेला तत्पर सेवा दिल्याबद्दल त्यांना आज महसुल विभागाचा आदर्श तलाठी पुरस्कार मिळाला आहे . गेली पाच वर्षे तलाठी दिपक कांबळे यांनी कोवाड ता . चंदगड येथे आपली सेवा तत्परतेने पार पाडली आहे .महापुरात स्वतःला झोकुन देऊन त्यांनी आपत्ती व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडले आहे . आज मिळालेल्या पुरस्कारामूळे चंदगड तालुक्यात त्यांचे मोठे कौतुक होत आहे .