*विचारांचे व्यासपिठ.....* *न्युज लाईफ चंदगड.....* ✒️✒️✒️✒️... *विचार बदला ... जिवण बदलेल ...*
कोवाड येथे मालवाहतुक गाडीच्या बंदला मोठा प्रतिसाद
Total Views :
1,463
.कोवाड /प्रतिनिधी .... कोवाड ता .चंदगड येथे आज बुधवार रोजी कोवाड व परिसरातील मालवाहतुक करणाऱ्या गाडी मालकांनी एक दिवसाचा बंद पुकारला होता .बंदला किणीकर्यात भागातील गाडीमालकांनी आपली गाडी बंद ठेऊन मोठा प्रतिसाद दाखवला . डिझेलच्या किमंतीत वाढ , जिवनाअवश्यक वस्तुंच्या किमंतीत वाढ ,पण ह्या वस्तु घेऊण जाणाऱ्या गाडीचे भाडे मात्र गेली पाच वर्षे आहे तसेच आहे . भाडयामध्ये वाढ नाही आहे .ह्या गोष्टीचा विचार व गाडी भाडयामध्ये कुठेतरी बदल व्हावा. या हितुने सगळयांचे लक्ष वेधण्यासाठी आज निटटूर रोड , कोवाड येथे सर्व मालवाहतुक गाडया दिवसभर बंद ठेवण्यात आल्या होत्या . व एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला होता .