कोवाड येथे नुलकर हॉस्पीटलचे उद्घाटन..

Total Views : 1,357
Zoom In Zoom Out Read Later Print

*परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आवश्य भेट दया .www.newslifechandgad.com आजच आमच्या न्युज लाईफ युट्युब चॅनलला सबस्क्राइब करा , लाईक करा आणि शेअर करा* *बातमी व जाहिरातीसाठी सर्पंक -9420131386*

कोवाड / प्रतिनिधी .. कोवाड ता . चंदगड येथे बुधवार दि .२२ रोजी , जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण ह्यांच्या हस्ते डॉ . हर्षद बाबासाहेब नुलकर  ह्यांच्या नुलकर हॉस्पीटलचे ,नेसरी रोड , कोवाड येथे उद्घाटन करण्यात आले . कोरोनाच्या परिस्थितीमूळे अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हॉस्पीटलचे उद्घाटन करण्यात आले . उद्घाटननंतर जि .प . सदस्य कल्लापा भोगण म्हणाले की आज कोरोनामुळे सर्वजण हैराण झाले आहेत . प्रत्येक घटकाला ह्याची झळ बसली आहे . प्रत्येकाने स्वतःची व परिसराची काळजी घेतली पाहीजे . अशा परिस्थितीत नुलकर हॉस्पीटल चे उद्धाटन खुप मोलाचे ठरेल .जनतेला आज डॉक्टरांची गरज आहे .डॉ . हर्षद नुलकर आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की शहरात सरकारी  दवाखान्यात काम केल्याचा अनुभव व पुण्यामध्ये कोवीडसेंटर  मध्ये काम केल्याचा अनूभव नक्कीच मला आज कोवाड व परिससातील लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे . यावेळी सरपंच सौ . अनिता भोगण तसेच ग्रा.प .सदस्य  तसेच बाबासाहेब नुलकर ,विष्णु बागिलगेकर , विठ्ठल पाटील , जयराम पाटील ,केरबा पाटील , शिवाजी मनवाडकर , पांडुरंग जाधव , दयानंद लांडे ,दिलावर मुल्ला , माजी सरपंच शशिकांत कोरी , नूर मुल्ला , 

आदम मुल्ला , मुनिर आल्लाखान , उस्मान मुल्ला , याकुब मुल्ला , लक्ष्मण पाटील , आप्पा व्हन्याळकर , दस्तगीर आल्लाखान आदी नागरीक उपस्थित होते .

See More

Latest Photos