.
चंदगड विधानसभा मतदार संघाला निधीची कमतरता भासणार नाही आमदार राजेश पाटील : कोवाड येथे बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ , ४० लाखाचा निधी मंजूर
Total Views :
1,084
कोवाड / प्रतिनिधी कोवाड , ता . २६ : महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी चंदगड विधानसभा मतदार संघाला निधीची कमतरता भासणार नाही अशी भूमिका घेतली आहे . गडहिंग्लज , आजरा व चंदगड तालुक्यातील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी उपमुख्यमंत्री अजीत पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सहकार्यामुळे साडेचार कोटींचा निधी मंजूर केला आहे . त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मतदारसंघातील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले .
येथील ताम्रपर्णी नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाला . त्यावेळी ते बोलत होते . अध्यक्षस्थांनी अशोकराव देसाई होते . कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्या स्मिता माने उपस्थित होत्या . बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल कोवाड भागातील शेतकऱ्यांच्यावतीने आमदार पाटील यांचा अशोकराव देसाई यांच्या हस्ते सत्कार केला . आमदार पाटील म्हणाले , " विधानसभेच्या निवडणूकीनंतर शेतीच्या पाण्याच्या प्रश्न अजेंट्यावर घेतला . ५५ ते ६० वर्षापूर्वी बांधलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांची पाहणी केली . अनेक बंधाऱ्यांचे बांधकाम जिर्ण होऊन पडझड सुरु झाली होती . त्यातून पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर होत होती . पाणी गळतीमुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला . पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधीचा निधी लागणार असल्याचे सांगितल्यानंतर उपमुख्यमंत्री अजीत पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडे निधीसाठी पाठपुरावा सुरु केला . त्यामुळे साडेचार कोटीचा निधी मंजूर झाला . टप्प्याटप्याने बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे . दुरुस्तीचे काम झाल्यानंतर नदीपात्रातील पाण्याची गळती थांबन शेतीला मुबलक पाण्याचा परवठा होणार आहे . "
कार्यकारी अभियंत्या माने म्हणाल्या , " नदीतील पाणी अडविण्याच्या उद्देशाने ६० वर्षापूर्वी कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांचे बांधकाम झाले आहे . पण अलिकडे या बंधाऱ्यांवरून जड मालाची वाहतूकही सुरू झाल्याने बंधाऱ्यांच्या कमानींचे दगड निखळून पडत होते . दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर बंधाऱ्यातील पाणी गळती पूर्णता बंद होणार आहे . “ यावेळी उपविभागीय अधिकारी तुषार पवार , शाखा अभियंता पी . एम . अर्जुनवाडकर , ठेकेदार परेश पोकळे , माजी उपसरपंच विष्णू आडाव , श्रीकांत पाटील , एस . एल . पाटील , विनोद पाटील , राहूल देसाई , बंडू चिगरे , म्हाळेवाडीचे सरपंच सी . ए . पाटील , किणीचे सरपंच संदिप बिर्जे , आप्पा जाधव , चंद्रकांत सुतार , सुवर्णा पाटील , सुवर्णा कुंभार , नुसरत मुल्ला , कृष्णा बिर्जे , शंकर पाटील , रविंद्र देसाई , मारुती बाळेकुंद्री , सुर्यकांत पाटील उपस्थित होते . रामा व्हन्याळकर यांनी सुत्रसंचालन केले . तानाजी आडाव यांनी आभार मानले .
..........