उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कोवाड येथे जंगी स्वागत

Total Views : 793
Zoom In Zoom Out Read Later Print

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कोवाड येथे जंगी स्वागत

कोवाड / प्रतिनिधी , ता. २७ ः लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलाना सन्मान निधी देण्याचे काम सरकारने केले आहे. पण विरोधकानी यावर वावठळ्या उठविल्या. महायुतीला पुढची पाच वर्षे सत्ता मिळाल्यास महिलांच्या सन्मान निधीत भरघोस वाढ होईल,असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाकडी बहिण योजनेंचा जास्तीत जास्त महिलानी लाभ घाव्या,असे आवाहन केले. यावेळी आमदार राजेश पाटील, खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते.



जनसन्मान यात्रेनिमित्त नेसरी येथे आयोजित केलेल्या सभेकडे जाताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा होसूर, कागणी, तेऊरवाडी व कोवाड येथे नागरिकांनी स्वागत केले. कोवाड परिसरातील महिलानी सरकारने लाडकी बहिण योजना सुरु करुन महिलाना आर्थिक आधार दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांचे औक्षण करुन त्याना राखी बांधली.  यावेळी उपस्थित महिला व नागरिकांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला. लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलाना पैसे मिळाल्याची चौकशी केली. महायुतीला पुढची पाच वर्षे सत्ता मिळाल्यास महिलांच्या सन्मान निधीत वाढ करणार असल्याचे सांगितले. शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची विजे बिले माफ करण्याचा सरकारने निर्णय घेतल्याचे सांगताना त्यानी महायुतीचे सरकार पुढची पाच वर्षे शेतकऱ्याना दिवसा विज देणार असल्याचे सांगितले. यावेळी अशोकराव देसाई, राहूल देसाई, विनोद पाटील, एस. एल. पाटील, डॉ. ए. एस. जांभळे, सुर्यकांत पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.




. . . . . . .

See More

Latest Photos