आमदार राजेश पाटील यांनी आमसभा घेतलीच पाहीजे : ऍड . सतोंष मळवीकर

Total Views : 701
Zoom In Zoom Out Read Later Print

आमसभा घेतलीच पाहीजे : ऍड . सतोंष मळवीकर

कोवाड / प्रतिनिधी

चंदगड विधानसभेचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी गेले पाच वर्षामध्ये एकही आमसभा न घेतल्यामुळे आज ऍड .सतोंष मळवीकर यांच्या नेतृत्वाखाली चंदगड तहसिल कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला . या वेळी ऍड सतोंष मळवीकर मोर्चाला संबोधताना म्हणाले की , आज चंदगडच्या ग्रामीण विकासाच्या संकल्पनेला खीळ बसली आहे.




आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की, विद्यमान आमदारांनी चंदगड विधानसभा मतदार संघामध्ये अनेक ठिकाणी रु. 1600/- कोटीचे विकासाचे बॅनर उभे केले आहेत. सद्य परिस्थिती पाहता चंदगड विधानसभा मतदार संघामध्ये आरोग्य शिक्षण पर्यटन या महत्वांच्या विभागामध्ये एकही काम पहावयास मिळत नाही. चंदगड तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था असून, जागोजागी खडयांचे साम्राज आहे. चंदगड तालुक्यातील आरोग्य विभाग आजारी असून, बरीच पदे रिक्त आहेत. त्याकडे विद्यमान आमदारांचे लक्ष नाही. गेल्या पाच वर्षामध्ये एकही मोठे हॉस्पीटल चंदगड तालुक्यात आणता आले नाही. चंदगड तालुक्यातील औदयोगिक वसाहत ओस पडली असून, बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. वन विभाग असूदे, एसटी डेपो महामंडळाच्या प्रवासांच्या समस्या असूदेत याकडे विद्यमान आमदारांचे लक्ष नाही. ते पुढे म्हणाले की ,



आज सर्व विभागांची दयनीय अवस्था असून, विद्यमान आमदारांनी एकही आमसभा घेतली नसून, आमदारांनी लवकरात लवकर आमसभा घेवून रु. 1600/- कोटीचा विकासाचा लेखा जोखा जनतेसमोर मांडावा, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन उभा करु याची दक्षता घ्यावी. असा इशारा देण्यात आला . यावेळी जगनाथ हुलजी , बी एम पाटील वाघराळीकर ,राजवर्धन शिंदे सामंबरेकर ,बाळासाहेब हळदनकर ,बाळाराम फडके,ॲड.खाचू नाकाडी ,बसवराज आरबोळे ,भरमू जाधव ,नरसु शिंदे ,बी.के काळापगोळ ,सुनील नाडगौडा ,दयानंद गावडे ,विश्वनाथ ओऊळकर ,उदय कुमार पाटील ,संभाजी मळवीकर,रोहिणी मेंणसे ,अरुण गवळी. यांनी आपल्या भावना व्यक्त करुण मोर्चात सहभाग दर्शवला . ह्या मोर्चामध्ये चंदगड तालुक्यातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते .



See More

Latest Photos