जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्रीराम विद्यालय उपविजेता

Total Views : 492
Zoom In Zoom Out Read Later Print

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्रीराम विद्यालय उपविजेता

कोवाड, ता. २१ ः जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत येथील श्रीराम विद्यालयाचा १४ वर्षाखालील मुलांचा कबड्डी संघ उपविजेता ठरल्याबद्दल विजयी संघातील खेळाडूंचा आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दि किणी कर्यात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकराव देसाई अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य एस. टी. कदम, उपप्राचार्य एस. एम. माने उपस्थित होते.

येथील श्रीराम विद्यालयात आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत विजयी संघातील खेळाडूंचा गौरव झाला. गोकूळ शिरगांव येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा झाल्या. श्रीराम विद्यालयाच्या कबड्डी संघाने स्पर्धेत पाच संघांचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता.  हातकणगलेच्या संघाबरोबर झालेला अंतिम सामना चुरशीचा झाला व त्यात दुसरा क्रमांक मिळाला. विजयी संघातील सर्व खेळाडूंचा सत्कार करताना आमदार राजेश पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळ आणि व्यायामाकडेही वळले पाहिजे. खेळातूनही करियर करता येते. जिद्द आणि चिकाटी ठेवली तर कोणतीही गोष्ट अवघड नसते. पण आपण जे काम करतो त्यावर निष्ठा ठेवली तर नक्की यश मिळते,असे सांगून खेळाडूंचे कौतुक केले. यावेळी जिल्हा व तालुकास्तरावरील विजेत्या सर्व खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी राहूल देसाई, अभय देसाई, एस. एल. पाटील, दत्तात्रय जोशी, विठ्ठल व्हन्याळकर, गजानन नांदुडकर, अनंत भोगण, बी. एस. तरवाळ उपस्थित होते. एस. पी. पाटील यांनी सुत्रसंचालन केले. एस. एम. माने यांनी आभार मानले.

--------------------

See More

Latest Photos