प्रा . दुंडगेकरांचे शैक्षणिक कार्य समाजाला मार्गदर्शक

Total Views : 245
Zoom In Zoom Out Read Later Print

प्रा . दुंडगेकरांचे शैक्षणिक कार्य समाजाला मार्गदर्शक

प्रा . दुंडगेकरांचे शैक्षणिक कार्य समाजाला मार्गदर्शक


चंदगड, ता. ६: प्रा. नामदेवराव दुंडगेकरांचे चंदगड तालुक्याच्या शिक्षण व सहकार चळवळीत  योगदान चिरंतन आहे . समाजाच्या विकासाचा ध्यास घेऊन त्यानी आपले उभे आयुष्य समाजासाठी खर्ची केले. त्यांचे शिक्षण, सहकार व राजकीय वाटचालीतल कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जेष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्रा. एन. एस. पाटील यांनी व्यक्त केले. चंदगड येथील प्रा. नामदेवराव दुंडगेकर चंदगड तालुका शिक्षण सेवकांच्या सहकारी पतसंस्थेमार्फत आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात प्रा. पाटील बोलत होते. अध्यक्ष सुनिल सप्ताळे यांच्या अध्यक्षस्येखाली र.भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. उन्मेश दुंडगेकर, जयश्री दुंडगेकर उपस्थित होते.

प्रा. अरुण जाधव यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष सुभाष गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रा. दुंडगेकर यांची शिक्षणाबद्दलची तळमळ सांगताना प्रा. पाटील म्हणाले, दुंडगेकर हे भाषा विषयाचे शिक्षक होते. त्यामुळे समाजाबद्दल ते संवेदनशील होते. शिक्षणासंबंधी त्यांचे विचार दिशादर्शक होते. त्यांचे विचार आजच्या तरुणपिढीला मार्गदर्शक ठरावेत, यासाठी पत संस्थेमार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे संस्थेने  सुरु केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी निबंध स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या तन्वी पाटील, कुणाल पाटील, शर्वरी पाटील, अनुष्का पाटील, श्रेया कोकीतकर, प्रज्ञा सुतार, पारस कोले, ऋतुजा पाटील, उमा दळवी, श्रध्दा सुतार, प्रतिभा पाटील, रेखा डंगारी या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. शिवाजी खरुजकर, प्रा. ए. टी. पाटील, प्रा. अरुण जाधव, विठ्ठल मोहिते, शिवाजी हुरेर, जोतिबा पाटील, सुभाष बेळगांवकर, एम.डी. पाटील, संजय पाटील, नंदकुमार पाटील, वंदना यादव, प्रदिप कुंभार उपस्थित होते. सुभाष बेळगांवकर यांनी सुत्रसंचालन केले. उज्वलराव देसाई यांनी आभार मानले.


चंदगड : निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना प्रा. एन. एस. पाटील, अध्यक्ष सुनिल सप्ताळे, उपाध्यक्ष सुभाष गावडे उपस्थित होते .

See More

Latest Photos