कोवाड येथे जल जीवनच्या टाकीसाठी साखळी उपोषण

Total Views : 160
Zoom In Zoom Out Read Later Print

कोवाड येथे जल जीवनच्या टाकीसाठी साखळी उपोषण

कोवाड / प्रतिनिधी 

कोवाड ता . चंदगड येथे जल जीवन मिशन या योजने अर्तंगत पावने दोन कोटी रूपयाचे जल जीवन योजनेचे काम सुरु आहे .पण या योजनेसाठी जी पाण्याची टाकी बांधली आहे . ती निकृष्ट दर्जाची असलेने ,ती टाकी पाडण्यासाठी  जिल्हा परिषद कोल्हापुर  यांनी १३ /१२ /२०२३ रोजी आदेश दिला आहे .परंतु ती टाकी पाडण्यासाठी दिरंगाई होत असलेने आज कोवाड येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले आहे . आज उपोषणाला जानबा कांबळे , संभाजी आडाव , अजित व्हन्याळकर, तानाजी आडाव ,कल्लापा वांद्रे , चंद्रकांत कुंभार , विजय सोनार , गोपाळ जाधव, शंकर पाटील , हे सर्व ग्रामस्थ उपोषणाला  बसले आहेत .आदेशाची तात्काळ अमंलबजावणी करा , अन्यथा उपोषणाची तीव्रता वाढवण्यात येईल असा सज्जड इशारा आज उपोषण कर्त्यानी प्रशासनाला दिला आहे .

See More

Latest Photos