गारगोटी कोदाळी रस्त्याचे काम दहा दिवसात सुरू करणार तत्पूर्वी तात्काळ खड्डे भरणार,,,,*

Total Views : 900
Zoom In Zoom Out Read Later Print

गारगोटी कोदाळी रस्त्याचे काम दहा दिवसात सुरू करणार तत्पूर्वी तात्काळ खड्डे भरणार,,,,* उप अभियंता करांडे यांचे ॲड मळविकर यांना लेखी आश्वासन.....

*गारगोटी कोदाळी रस्त्याचे काम दहा दिवसात सुरू करणार तत्पूर्वी तात्काळ खड्डे भरणार,,,,*

          उप अभियंता करांडे यांचे ॲड मळविकर यांना लेखी आश्वासन.....

     चंदगड / प्रतिनिधी .   गेल्या तीन दिवसापासून सुरु असणाऱ्या गारगोटी तिलारी रस्त्या संदर्भात आज आंदोलन झाले. कंत्राटदाराचा पुतळा जाळण्यात आला .आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन उपअभियंता करांडे यांनी वरिष्ठांची बोलणी करून रस्त्याचे काम दहा दिवसात सुरू करणार व तत्पूर्वी खंडे तात्काळ भरणार असल्याचे लेखी आश्वासन adv संतोष मळवीकर व हेरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपअभियंता करांडे यांनी दिले.

         सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर सकाळपासून हेरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. adv मळवीकर यांनी दिलेला इशारा व अभियंत्यांनी बोलवलेल्या बैठकीकडे सर्व तालुक्याचे लक्ष होते. आंदोलनकर्ते सुरुवातीलाच आक्रमक रित्या अधिकाऱ्यांवर धावून गेले कंत्राटदारांचा पुतळा कार्यालयासमोर जाळण्यात आला यावेळी दिलेल्या घोषणांनी सार्वजनिक बांधकाम परिसर दुमदुमून निघाला adv मळीविकारांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले .

      यावेळी पार्ले चे सामाजिक कार्यकर्ते सुधाकर गावडे हेरे चे सरपंच पंकज तेलंग कोळींद्रे चे सरपंच संजय गावडे कळसगादे चे उपसरपंच दौलत दळवी ,संभाजी कांबळे, हेरे चे उपसरपंच आप्पाजी गावडे, अशोक दळवी, यांनी रस्त्याच्या बाबतीत आक्रमक पवित्रा घेतला.

         महादेव प्रसादे यांनी वरिष्ठांशी बैठक लावण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी एकतर लेखी द्या अन्यथा या रस्त्यावरचे खड्डे भरा असा आग्रह धरला यावेळी उप अभियंता यांनी वरिष्ठांना आक्रमक आंदोलकांची तीव्रता लक्षात आणून दिली. यावेळी सर्वांशी चर्चा करून दहा दिवसात गारगोटी- कोदाळी रस्त्याचे काम सुरू करणार, व तत्पूर्वी खड्डे डांबरीकरणाने भरणार असल्याचे लेखी आश्वासन adv संतोष मळवीकर व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना करांडे यांनी दिले.

         यावेळी चंदगड पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त ठेवला होता .बांधकाम विभागाचे मुल्लानी, भरत पाटील, धनंजय गावडे ,यांचेसह सर्व स्टाफ हजर होता .तर आंदोलनात अंकुष गवस, महादेव गुरव, सोमनाथ चांदेकर, विशाल बल्लाळ, शंकर चव्हाण ,राजू पाटील ,संतोष गावडे, परशुराम पवार, कृष्णकांत पिलारे ,शिवाजी गावडे, संभाजी गावडे, जानकु देसाई ,परशुराम फडके, सुशील दळवी, अनिल गावडे ,सुरेश दळवी,  ,सुभाष लांबोर, सुरेश दळवी, इत्यादी हेरे पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

See More

Latest Photos