म्हाळेवाडीकरांच्या सामाजिक बांधिलकीला सलाम .....

Total Views : 1,415
Zoom In Zoom Out Read Later Print

*विचारांचे व्यासपिठ.....* *न्युज लाईफ चंदगड.....* ✒️✒️✒️✒️... *विचार बदला ... जिवण बदलेल ...*

कोवाड / बाबासाहेब मुल्ला ...... कोरोनाने  आज सर्वांना खुप कांही शिकवले आहे . कोरोनामध्ये अनेकांचे नातेसबंध दुरावले तर अनेकांनी कांहीच्या जिवणात सुख देण्याचा पर्यत्न  केला .आज ही ग्रामीण भागातील माणुस आपल्या गावातील  दुःख आपले ,दुःख समजतो .आपुलकीने मदतीसाठी पुढे जातो . कांही अपवाद वगळता आजही खेडयामध्ये माणुसपण जिवंत आहे . हाकेला हाक देणारी माणसे आहेत . शेवटी आयुष्य हे नश्वर आहे . आपण जेव्हां दुसऱ्याच्या वाईट प्रसंगी मदतीसाठी जातो , तेव्हां जे समाधान मिळते ते खुप मोठे असते . चंदगड तालुक्यातील म्हाळेवाडी गावचा आदर्श , त्यांची सामाजिक बांधिलकी आज प्रत्येकाला प्रेरणादायी ठरणार आहे .कोरोनाने अनेकांचे बळी घेतले .  भितीच्या छायेत लोक आपले जिवण जगत होते . प्रत्येक सकाळ हि दुःखद बातमी घेऊनच येत होती .म्हाळेवाडी ता .चंदगड येथे २७ एप्रिल ची सकाळ गावाला खुप वेदनादायी ठरली .सर्वांचा  लाडका असलेल्या अमृतने ऐन तारुण्यात जगाचा निरोप घेतला होतो .मृत्युचे कारण होते कोरोना . पुण्याला रोजीरोटीसाठी गेलेला अमृत परत आलाच नाही . कै. अमृत धोंडीबा दळवी यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलगे , आई , वडिल , भांवडे असा परिवार आहे . पण वेदना संपृर्ण गावाला झाल्या . अमृतच्या घरची परिस्थिति बेताची , तरूण मुलगा अचानक गेल्याने कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला .हे दुःख पचवणे खुप अवघड असते . अशा परिस्थितीमध्ये त्यांना मदत करणे हे खुप मोठे कार्य आहे . अशातच कै . अमृतचे वर्गमित्र एकवटले मित्राच्या अचानक गेल्याने , प्रत्येकाचा कंठ दाटुन आला . त्यांनी ठरवले की , आपण कै . अमृतच्या घरच्यांना मदत करायची , वर्गमित्रांनी चांगली रक्कम जमवली .व मदत सुरू झाली . आम्ही म्हाळेवाडीकर ग्रुप , गावातील नोकरवर्ग , सामाजिक कार्यकर्ते ,मंडळे , बाहेरगावी नोकरिला  असणारे कांही जणं , गावातील नागरिक . अशा दानशुर लोंकानी दोन लाख एक्कावन हजार चा मदतनिधी आज  आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते कै . अमृत दळवीच्या कुटुंबियांना सुपुर्द करण्यात आला . हिच आहे म्हाळेवाडीकरांची सामाजिक बांधिलकी ... ह्या बांधिलकीला न्युज लाईफचा सलाम ...

See More

Latest Photos