कोवाड येथे प्रशासनाची कोरोना संदर्भात मिटींग

Total Views : 897
Zoom In Zoom Out Read Later Print

*परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आवश्य भेट दया .www.newslifechandgad.com आजच आमच्या न्युज लाईफ युट्युब चॅनलला सबस्क्राइब करा , लाईक करा आणि शेअर करा* *बातमी व जाहिरातीसाठी सर्पंक -9420131386*

कोवाड / प्रतिनिधी .... कोवाड ता चंदगड येथे आज कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  ग्रामपंचायत  कोवाड येथे प्रशासनाची  मिटींग पार पडली...प्रशासनाने व्यवसायीकांसाठी काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे .

1) सर्व व्यापार्यांनी व दुकानातील कर्मचाऱ्यांनी  कोवीड प्रतिबंधक लस दोन दिवसात घ्यावी...(ज्या व्यापार्यांचे वय 45 पेक्षा कमी आहे त्यांनी खासगी रूग्णालयात लस घ्यावी .लस घेतलेले प्रमाणपत्र नसेल तर दुकानावर  दंडात्मक कारवाई करणेत येईल.

2)शासनाने याआगोदर ज्या अत्यावश्यक सेवा दुकानांना परवानगी दिलेली आहे तेवढीच दुकाने आता सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील.सदर दुकानदारांनी ..मास्क..सँनिटायजर..सोशल डिस्टनसींग साठी दुकानासमोर बँरीकेट्स या सर्व गोष्टी तंतोतंत पाळाव्यात.

3)गुरूवारचा आठवडी बाजार बंद राहील.

4) मास्क न वापरणार्या व्यक्तींना पाचशे रूपये दंड आकारण्यात येईल.

5)विनाकारन व विनामास्क विनालायसन्स कोवाड बाजारपेठेत फिरणार्यांच्या गाड्या जप्त करण्यात येतील.

अशाप्रकारच्या सक्त सुचना प्रसासनाने दिलेल्या आहेत.नियमांचे उल्लंघन करणार्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी दखल घ्यावी.

मिटिंगला जि. प सदस्य कल्लापण्णा भोगण , सरपंच अनिता भोगण,उपसरपंच पुंडलिक जाधव ,मंडल अधीकारी शरद मगदुम .तलाठी दिपक  कांबळे .कोवाड पीएचसी डाँ चौगुले .व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम , ग्रामसेवक  जि.एल पाटिल  पोलीस काँ शिंदे , यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

See More

Latest Photos