६ एप्रिल, रोजी शिवाजी विद्यापीठाच्या पदव्यांची होळी करणार - डॉ.नागेंद्र जाधव

Total Views : 867
Zoom In Zoom Out Read Later Print

.


       चंदगड / प्रतिनिधी .           प्रा.डॉ.नागेंद्र जाधव रा.देवरवाडी ता.चंदगड दि .२१ जून २००२ पासून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथे इतिहास विषयाचा अधिव्याख्याता म्हणून कार्यरत असून त्यांची सेवा नियमित करण्यात यावी यासाठी उच्च न्यायालयात त्यांनी एकूण चार रिट याचिका दाखल केल्या आहेत.न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशात त्यांची सेवा पूर्ववत सुरु ठेवण्याबाबत स्पष्ट आदेश देवूनही सर्व प्रतिवादी संस्था ,महाविद्यालय ,विद्यापीठ जाणीवपूर्वक न्यायालयीन आदेशांचा मनमानी अर्थ काढून प्रा.जाधव यांना अध्यापनाच्या सेवेपासून अलिप्त ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

             प्रा.जाधव यांनी संस्था व विद्यापीठ यांच्या अन्यायी कारभाराच्या निषेधार्थ अर्ज ,विनंती,निवेदने,उपोषण ,आत्मदहन,बेमुदत सत्याग्रही धरणे आंदोलन केली आहेत.महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी शिक्षण मंत्रालय आपल्या दारी या विद्यापीठात आयोजित केलेल्या तक्रार निवारण बैठकीत मा.न्यायालयाच्या आदेशानुसार तातडीने बैठक घेवून कार्यवाही करावी असे स्पष्ट आदेश संबधीताना देवूनही आजअखेर प्रा.जाधव यांची सेवा सुरु ठेवण्याबाबत ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.

             प्रा.नागेंद्र जाधव यांच्यावर जाणीवपूर्वक संगनमताने केलेल्या या अन्यायामुळे त्यांच्यावर उपासमार सहन करण्याची वेळ आली आहे.नैसगिक महापूर आपत्ती ,कोरोना महामारी आणि विद्यापीठाची मानवनिर्मित आपत्ती यामुळे प्रा.जाधव उच्च विद्याविभूषित असूनही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी प्रसंगी त्यांना कुलमजुरी,हमाली करावी लागत आहे.म्हणून अत्यंत नाईलाजाने मुजोर दौलत विश्वस्थ संस्था,हलकर्णी ता.चंदगड आणि शिवाजी विद्यापीठ प्रशासन यांनी संगनमत करून माझ्यावर केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ ६ एप्रिल,२०२१ रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील ५६व्याऑनलाईन पदवीदान दीक्षांत समारंभात विद्यापीठाने डॉ.जाधव यांना सन्मानपूर्वक दिलेल्या पदव्यांची जाहीर होळी करून त्यांनी केलेल्या अन्यायाचा तीव्र निषेध करण्याचे त्यांनी ठरविले आहे.

See More

Latest Photos